कृष्णूर येथे मेगा फूडस कंपनीकडून कच्च्या हळद खरेदीस प्रारंभ,शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण

शेतकऱ्यांच्या हितासाठीच घेतला निर्णय -अजय बाहेती

*************************************************

नायगाव दि 17- नायगाव तालुक्यातील नांदेड

ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या इंडिया मेगा ऍग्रो लिमिटेड , एम आय डी सी कृष्णूर या कंपनीने शेतकऱ्याच्या सुविधेसाठी कच्ची हाळद व मंढा ,चणा खरेदी सुरू केली आहे.या मुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सोयाबीन पाठोपाठ हळद,हरभरा खरेदी मुळे शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे, कंपनीने शेतकऱ्याच्या हितासाठीच हे मोठे पाऊल उचलल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यानी यंदा मोठ्या प्रमाणात हळद या पिकाची लागवड केली होती, इंडिया मेगा ऍग्रो लिमिटेड ही कंपनी आपल्या अनेक उत्पादन निर्मिती सोबतच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याबाबतही महाराष्ट्रात अग्रेसर आहे, नुकतेच या कंपनीने शेतकऱ्याच्या शेतातील कच्ची हळद खरीदी करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी वर्गाला कच्ची हळद शिजवण्याचे काम खूप अवघड व जिकिरीचे ठरते.कंपनीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे.

कच्ची हळद विक्रीयोग्य करणे ही बाब ग्रामीण शेतकऱ्यांना वेळखाऊ, किचकट,खर्चिक व कष्टप्रद वाटत होती, कंपनीने थेट कच्ची हळदच योग्य दरात खरीदी सुरू केल्यामुळे शेतकरी वर्गासाठी ही आनंदाची बाब ठरली आहे.

जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांना या संधीचा मोठा लाभ होणार यात शंका नाही, या कंपनीने या पूर्वीच सोयाबीन, हरबरा, अशा मालाची शेतकऱ्या मार्फत थेट खरेदी केल्यामुळे शेतकऱ्याना फायदाच झाल्याचा अनुभव आहे. शेतकरी बांधवानी कच्ची हळद थेट व योग्य दरात विकण्यासाठी कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि