राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित विविध मान्यवरांना पुरस्कार व गौरव पत्र प्रदाननायगाव दि 26- भक्ती स्थळ अहमदपुर येथे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा १०५ वा जन्म उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून भाविकांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला.

शिवकीर्तनकार कीर्तन केशरी भगवंतराव पाटील चांभरगेकर यांचे ''संताचे हे ब्रीद तारावे सकल, या बसवलिंग महाराजांच्या अभंगावर चिंतन झाले. यावेळी अनेक कीर्तनकार मंडळी टाळकरी म्हणून उपस्थित होती. राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय नाम घोषात भस्म उधळण करण्यात आले.या नंतर सद्गुरू राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज, बसवलिंग शिवाचार्य महाराज, आचार्य गुरूराज स्वामी ,जेष्ठ कीर्तनकार भगवंतराव पाटील चांभरगेकर, कीर्तनकार मंडळाचे अध्यक्ष शिवराज नावंदे गुरूजी,माजी आ.विनायकराव पाटील,प्रा.विश्वाभंर स्वामी आदी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक यांना "वसुंधरा रत्न राष्ट्रसंत श्री श्री १०८ शिवलिंग शिवाचार्य महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला,

महाराष्ट्र शिव संप्रदायीक कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक मंडळाच्या वतीने कीर्तनकार विकास महाराज भुरे, कीर्तनकार संजय महाराज येळापुरे, कीर्तनकार परमेश्वर महाराज केते,गायणाचार्य जनार्दन महाराज बेंद्रीकर,मृदंगाचार्य महादय्या स्वामी नंदगावकर,अंतेश्वर हालकुडे, महादेव अप्पा लामतुरे, शंकर अप्पा येरूळे, गंगाधर अप्पा भेंडेगावकर, नागनाथ अप्पा कलशेट्टी यांना गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी भक्ती स्थळ हे भक्तांचे आहे.राष्ट्संत हे सर्वांच्या-हदयात असून त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे.कीर्तनकार मंडळीने शिव संप्रदायाचे वैभव वाढवून ही पंरम्परा प्रोत्साहित करावी असे या वेळी सांगण्यात आले. यावेळी सद्गुरू राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा अमृत उपदेश झाला.विविध ग्रंथांचे प्रकाशनही करण्यात आले.यावेळी कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक,भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्र संचलन कीर्तनकार बालाजी पाटील येरूळकर यांनी केले


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि