रातोळी ग्राम पंचायतीने भरवली महिला दिनानिमित्त महिलांची ग्राम सभा,विविध प्रश्नांवर झाली चर्चा


नायगाव दि 08- जागतिक महिला दिनानिमित्त रातोळी ग्रामपंचायत कार्यालयातर्फे श्री रोकडेश्वर महाराज देवस्थान रातोळी येथे महिला व बाल ग्रामसभा घेण्यात आली

या ग्रामसभेत अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी व महिला बचत गटाचे अध्यक्ष सचिव सदस्य सरपंच सौ सुमनबाई पिराजी देशमुख ,उपसरपंच धम्मानंद नारायण सोनकांबळे ,ग्रामसेवक वडजे साहेब , ग्रामपंचायत सदस्य सौ ललिता बाई व्‍यंकटराव पांचाळ, कमलबाई शिवराज पाटील, सौ आशाताई संजीव पाटील, सुमनबाई श्रावण गायकवाड ,सतीश व्यंकटराव इंगोले ,दत्तात्रेय जयसिंग गायकवाड, राहुल शिवराज ,मारुती पाटील, विजय चंदराव पाटील, गंगाधर गायकवाड तसेच गावातील महिलावर्ग व

प्रतिष्ठित नागरिक हजर होते

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रातोळी ग्रामपंचायतिच्या वतीने महिला ग्रामसभा सरपंच सौ सुमनबाई पीराजी देशमुख यांनी आयोजित केली होती . या ग्रामपंचायतीच्या इतिहासात आजवर ही पहिलीच महिला ग्रामसभा होती, त्यामुळे स्थानिक महिलांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदवला होता.

ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमनबाई पिराजी देशमुख यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या सभेचे उद्घाटन केले, या ग्राम सभेसाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, पोस्टाचे कर्मचारी त्याचबरोबर महिला बचतगटाचे अध्यक्ष-सचिव आणि सदस्य उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने आरोग्या सम्बधी ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ची चर्चा करण्यात आली, त्याच बरोबर अंगणवाडी संदर्भात काही अडचणी होत्या त्याचीही चर्चा या सभेत करण्यात आली,

महिला बचत गटाच्या काही समस्या होत्या तसेच गावातील नाल्या दुरुस्त करणे, घरोघर नळाची व्यवस्था करणे, लाईटची व्यवस्था करणे, अशा सार्वजनिक कामाच्या चर्चेसह गावात मटका,दारू सारखे अवैध धंदे सुरू आहेत ,ते बंद करावेत यासाठी महिलांनी स्वाक्षऱ्या नोंदवून मागणी केली, महिलांच्या दैनंदिन समस्यांबाबत ही चर्चा करण्यात आली.

आरोग्य विभागाच्या घंटेवाड मॅडम यांनी महिलांना स्वच्छते बाबत व निरोगी राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, बाल संगोपन व कुटुंबाच्या आरोग्यासाठी महिलांच्या जबाबदारीबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली,

ग्रामपंचायत सदस्य सतीश यांनीसुद्धा महिलांना स्वछता व आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच धम्मानंद सोनकांबळे यांनी प्रास्ताविक करताना जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि जागतिक महिलादिन का साजरा केला जातो हे सांगितले,त्याचबरोबर सरपंच प्रतिनिधी पिराजी संभाजीराव देशमुख यांनी सर्वं महिलांचे आभार मानून या सभेची सांगता केली


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि