लोकसहभागातून उभारलेल्या 'साई माऊली' कोविड सेंटरचे जिल्हाधिकारी डॉ.इटनकरांच्या हस्ते उद्घाटन


नायगाव दि 24- समाज माध्यमाचा चुकीचीच माहिती पसरवून दुरुपयोग केला जात असल्याचा अनेकांचा आरोप असतो पण याच समाज माध्यमातून चांगले कामही प्रत्यक्षातहोवू शकते हे या कोविड सेंटरची निर्मिती करून नायगावकरांनी दाखवून दिले आहे. "आवाज नायगावचा" या स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांच्या व्हाट्सएप ग्रुपवर वाढत्या कोरोनावर चिंता अनेक सदस्यांनी व्यक्त केली होती,या चर्चेदरम्यान सामाजिक जाणिवेतून काम करणारे नायगावचे खाजगी वैद्यकीय तज्ञ डॉ. विश्वास चव्हाण यांनी आ.लंके याचा या बाबत आदर्श घेण्याचा मेसेज टाकला, यावर त्या ग्रुप चे ऍडमिन नागेश कल्याण यानी लोकसहभागातून नायगावलाही सार्वजनिक उपयोगाचे कोविड सेंटर झाले पाहिजे ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्वानीच सकारात्मक प्रतिसाद दिला अनेकांनी सहकार्य करण्याबरोबरच मदतीची तयारी दाखवली.व प्रत्यक्षात कोविड सेंटरची निर्मिती झाली. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून माजी आ. तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी लिटल स्टेप ही शाळा कोविड सेंटरला उपलब्ध करून तर दिलीच आणि इतर आवश्यक मदत सुद्धा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. यामुळे या उपक्रमाला प्रत्यक्षात उभारी मिळू शकली.

स्थानिक दानशुरांच्या दातृत्वातून नायगाव येथे सार्वजनिक कोविड सेंटरची स्थापना झाल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी डॉ बिपीन इटनकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांनी विनाकारण न फिरता घरीच सुरक्षित राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र चव्हाण यांनी केले तर आभार धनराज शिरोळे यांनी मानले.

यावेळी बिलोली उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, नायगाव उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, तहसीलदार गजानन शिंदे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, श्रीनिवास चव्हाण, विजय चव्हाण, माजी सभापती सयद रहीम सेठ ,पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ, वैद्यकीय अधिक्षक एच.आर. गुंटूरकर,डाँ नरेंद्र देशपांडे,ता.आरोग्य अधिकारी डॉ शेख बालन आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्विते साठी डॉ. विश्वास चव्हाण, पत्रकार नागेश कल्याण, चेअरमन प्रदीप पा. कल्याण, यादव पाटील शिंदे, पांडुरंग चव्हाण, माणिक चव्हाण, साईनाथ मेडेवार, प्रताप पा. सोमठाणकर, सतीश लोकमनवार, बालाजी शिंदे, गणेश नायगावकर, सुधाकर जवादवार, कैलास रामदिनवार, साईनाथ घन्नावार यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि