तुम्ही तुमचं चालू द्या..आमचं तर सुरूच आहे....!!..रेती माफिया व प्रशासनाची अशीही जुगलबंदी

*************************************************

पेनुरात 105 ब्रास रेती लिलावातून सुमारे पाच लाखांचा महसूल शासन दरबारी जमा

*************************************************

सोनखेड दि 09 - लोहा तालुक्यातील रेती तस्करांचा हॉट स्पॉट असलेल्या पेनूर येथे दि 08 एप्रिल च्या रात्री झालेल्या प्रशासकीय कारवाईत 105 ब्रास रेतीच्या लिलावातून पाच लाखांचा महसूल जमा झाल्याची माहिती कळाली

लोहा तालुक्यातील पेनूर भागात मागील बऱ्याच वर्षांपासून रेती तस्करी जोरात सुरू आहे,वेळोवेळी तक्रारी आल्यावरून खुद्द मा. जिल्हाधिकारी महोदयांनी महसूल प्रशासनाला या भागात लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत,दि 08 एप्रिल रोजी उप विभागीय अधिकारी पांडुरंगराव बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेनूर घाटावर महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच सोनखेड चे सपोनि महादेवराव मांजरमकर व पोलीस कर्मचाऱ्यांची संयुक्त करावाइ रात्रभर सुरू होती,या कारवाईत 105 ब्रास रेती साठे जप्त करण्यात आले,या रेतीच्या माध्यमातून पाच लाखांचा महसूल प्राप्त करण्यात या पथकाला यश मिळाले आहे,या कारवाई दरम्यान महसूल पथक व रेती वाहतूक दारात जोरदार शाब्दिक चकमक झाली,त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला,परंतु पोलीस प्रशासनाने सतर्क हस्तक्षेप करून कारवाई यशस्वी होण्यासाठी आपली भूमिका पार पाडली दोन महिन्यांच्या कालावधीत अशा स्वरूपाची तिसरी कारवाई झाली असल्यामुळे रेती तस्करांचे कंबरडे मोडण्याचा पवित्रा आता प्रशासनाने घेतल्याचे दिसून आले आहे,या तस्करांना राजकीय संरक्षण असल्यामुळे वर्षानुवर्षे ही तस्करी सुखेनैव सुरू आहे,या भागात दररोज जवळपास पाचशे ब्रास रेतीचा उपसा या तस्कराकडून सुरू असल्याची माहिती आहे,प्रशासनाने वेळोवेळी कार्यवाही करूनही रेती माफियांची शिरजोरी कमी होत नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे,कालच्या या कारवाई मुळे या तस्करी वर कितपत परिणाम होणार हे लवकरच दिसून येईल,

दरम्यान केवळ पेनूर घाटच नव्हे तर गंगा काठच्या अनेक ठिकाणा वरून रेती तस्कर सध्या पात्रातली रेती पळवत असल्याचे दिसून येत आहे,मा.जिल्हाधिकारी यांनी मनावर घेऊनही या तस्करीचत म्हणावा तसा फरक अजूनही पडला नसल्याचे चित्र आहे,सध्या कोविड संकटामुळे प्रशासनही वेगवेगळ्या जबाबदाऱ्याच्या ओझ्यामुळे व्यस्त आहे,याच मोक्याचा फायदा उठवत मागील एक वर्षाच्या कालावधीत गोदावरी नदीच्या पात्रातून जिल्ह्यात रेती तस्कर जोमाने रेती पळवत आहेत,एखादी कारवाई झालीच तर एक दोन दिवस दबा धरून बसणारे रेती तस्कर लगेचच तुम्ही तुमची कार्यवाही करा आम्ही आमचे कार्य करू असे जणू प्रशासनाला आवाहन देत सक्रिय होत आहेत,या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास जिल्हा महसूल प्रशासनाला खरेच यश येईल का असा प्रश्न ही जुगलबंदी पाहणाऱ्या जनतेतून विचारल्या जात आहे


---माणिकराव मोरे,

पत्रकार, सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि