अवैध रेती वाहतूक करणारी दोन हायवा वाहने सोनखेड पोलिसांच्या ताब्यात


सोनखेड दि 01- लोहा तालुक्यात सध्या अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचा धुमाकूळ सुरू असून वेळोवेळी महसूल,पोलीस प्रशासनाकडून कारवाई होऊनही हे रेती तस्कर आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे,आज भल्या पहाटे तीन च्या सुमारास शेवडी ब. व दगडगाव परिसरात महसूल खात्याच्या पथकाने कारवाई करून अवैध वाहतूक करणारी दोन हायवा वाहने ताब्यात घेऊन सोनखेड पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत

मागील बऱ्याच दिवसापासून या भागातून अव्याहत पणे रेतीची अवैध तस्करी सुरू आहे, मागील महिन्यात महसूल प्रशासन ग्रामपंचायत निवडणुकीत व्यस्त असल्याची संधी साधून या तस्करांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याची माहिती ऐकावयास मिळत आहे,प्रशासनाने या पूर्वीही अनेक कारवाया केल्या,या तस्करांचे तराफे जाळले,रेती जप्त केली परन्तु या अवैध व्यावसायिकांचे थैमान आटोक्यात येत नसल्याची परिस्थिती आहे,

उपविभागीय अधिकारी पांडुरंगराव बोरगावकर, तहसीलदार विठ्ठलराव परळीकर यांच्या आदेशावरून काल रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले,आज पहाटे तीन वाजता या पथकाने रचलेल्या सापळ्यात रेती तस्करांच्या दोन हायवा वाहने मुद्देमालासह सापडली, या पथकाने कारवाई साठी शासकीय वाहने न वापरता खाजगी वाहने वापरली हे विशेष होय,शेवडी बा. परिसरात MH26 BE 8900 क्रमांकाची हायवा पाच बरास रेतीसह पथकाच्या हाती लागले तर MH 26 BE 9799 या क्रमांकाची हायवा दगडगाव परिसरात रस्त्यावर शिताफीने पकडण्यात आली,पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी डी एल कटारे यांनी या प्रकरणी रीतसर तक्रार नोंदवून दोन्ही वाहने सोनखेड पोलिसांच्या स्वाधीन केली व कारवाईचा तपशील वरिष्ठांकडे सादर केला आहे,या बाबत वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे,महसूल खात्याच्या या पथकात तलाठी मारोती कदम,राजू इंगळे, संतोष असकूलकर,अरविंद कावळे,शामसुंदर सरोदे,निकम आदींचा समावेश होता


--- माणिकराव मोरे,

पत्रकार, सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि