स्टेट बँक ऑफ इंडिया व धान फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार


नायगाव दि 06 -विविध महिला बचत गट सक्षमीकरणासाठी एसबीआय महाराष्ट्र मंडळ व धान फाउंडेशन यांच्यात दिनांक 6 फेब्रुवारी 2021 ला सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी एसबीआय च्या महाराष्ट्र मंडळाचे उपमहाप्रबंधक श्री संतोष कुमार मोहपात्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित महिलांना बचत गट कर्ज वाटप विषयी आणि परत फेडीसंदर्भात अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी एसबीआय क्षेत्रीय कार्यालयाचे श्री संजय हाडके, शंकर येरावार आणि श्री राममूर्ती तसेच धान फाउंडेशन तर्फे श्री शिवानंदन आणि श्री सेलवी राजू उपस्थित होते. श्री हाडके सरांनी महिला सबलीकरणासाठी स्टेट बँकेच्या बचत गटाच्या विविध कर्ज योजनाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच भारतीय स्टेट बँक ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरण व उद्धारासाठी सदैव काम करत राहील अशी ग्वाही दिली.

आजच्या सोहळ्यानिमित्त एसबीआय क्षेत्रीय कार्यालय नांदेड आणि डी एस एच नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 117 महिला बचत गटांना एक कोटी 43 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजनासाठी धिरज हिरे, किरण चांदोरकर, शिल्पा जिंतुरकर , श्रीमती सारिका खेडकर आणि श्रीमती माधवी यांनी धान फाउंडेशन तर्फे प्रमुख भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाअंतर्गत महिला बचत गटाचे भव्य स्टॉल्स लावण्यात आले होते या स्टॉल्स ला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि