नायगाव तालुक्यातली पाच गावे प्रतिबंधीत क्षेत्रात, देगाव ग्रामपंचायतीनेही केले गाव सील


नायगाव,दि 23- तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता नायगावाचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सावरखेड,होटाळा घुंगराळा, रुई व देगाव ही पाच गांवे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे

सुरुवातीच्या काळात मध्यम व गर्भश्रीमंतांनाच भेडसावणारा कोरोना आता गोर गरिबांच्या घरातही घुसला आहे. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महापालिका क्षेत्रात पूर्वी फैलावलेला कोरोना यावेळी मात्र गावखेड्यामधले जीवनही उध्वस्त करतांना दिसत आहे. पहिल्या लाटेत नांदेड शहरातच व काही अंशी तालुक्यांच्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळून येत होते. मात्र सध्याच्या दुसऱ्या लाटेत या महामारीने खेड्यापाड्यातील, वडितांड्यातील गोरगरिबांच्या घरावर हल्ला चढवल्याचे दिसून येत आहे.

या कोरोना तांडवामुळे आरोग्य यंत्रणेवर मात्र प्रचंड ताण येत आहे. ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा कहर चालू असताना महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे,त्याच धर्तीवर नांदेड जिल्यातील नायगाव तालुक्यातील देगाव ह्या गावातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी स्वतः ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन दि. 22/04/2021 रोजीच्या बैठकित प्रतिबंधित क्षेत्र असलेले देगाव येथे कडक नियमावली लावण्याचा निर्णय घेतला आहे.

गावात आवश्यक तिथे बॅरिकेट्स लावणे, गावात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची आवक जावक नोंद ठेवणे, गावात संचारबंदी लागू करण्यासाठी दवंडी देणे व पोलीस प्रशासनाला पेट्रोलिंगसह,गावात 2 पूर्णवेळ पोलीस कर्मचारी देण्याची विनंती,व गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना नियोजन इत्यादी महत्वाचे निर्णय घेऊन गाव पूर्णपणे सील करण्याचा निर्णय सर्वानुमताने घेण्यात आला यावेळी सरपंच डॉ. दत्ता मोरे, ग्रामसेवक बोंडले, वैद्यकीय अधिकारी डॉ.राजीव कदम, एमपीडब्लू मच्छे, तलाठी डावरगावे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या वतीने लागू झालेल्या लॉकडाऊन चे नियम लोकांनी अधिक कठोरपणे पाळावे यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना देखरेखीसाठी जबाबदारी देण्यात आली आहे,

तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना ट्रेसिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या, विनाकारण फिरणाऱ्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि