भावकीचा वाद ..सारेच बरबाद..; सोनखेड येथील आत्महत्येप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

सोनखेड दि 07- येथील प्रतिष्ठित शेतकरी

संभाजी यादवराव मोरे वय 57, यांनी दि 29 मार्च रोजी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान परिसरातील लक्ष्मण आतमराव यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली होती, याबाबत फिर्याद आल्यावरून सोनखेड पोलिसांनी याच कुटुंबातील पिता पुत्रावर आत्महत्येस कारणीभूत झाल्या बाबत गुन्हा नोंदवला आहे

संभाजी यादवराव मोरे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती,परन्तु मयताचा मुलगा फिर्यादी व्यंकटी संभाजी मोरे याने पोलिसांकडे मयताचा भाऊ व मुलगा हे दोघेजण आपल्या वडिलांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याबद्दल सोनखेड पोलिसात

फिर्याद दिली आहे,या कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीचा वाद मागील 10 वर्षांपासून प्रलंबित आहे, यापूर्वी मयताच्या आरोपीत भावाने व पुतण्याने मायताला गट नंबर 313 एक हेकटर 44 आर जमिनीत पेरणी करू दिली नाही,तसेच मागील हंगामात गट नंबर 309 व 314 मधील 72 आर जमीनित पेरा केला असता रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामात जनावरे फिरवून पिकांची नासाडी केली व 3 लाखाचे नुकसान केले,यापूर्वी या पिता पुत्रांनी आठ दहा वेळेस मयताला व फिर्यादीला मारहाणही केली आहे,अशा सततच्या जाचामुळे व वेळोवेळी झालेल्या आर्थिक नुकसानी मुळे अस्वस्थ झालेले आपले वडील संभाजी यांनी आत्महत्या केली असे फिर्यादी चे म्हणणे आहे, या संदर्भात सोनखेड पोलिसांनी आरोपीत मारोती यादवराव मोरे,यादव मारोतीराव मोरे या पिता पुत्रावर गु र न 49 / 2021 कलम 306,506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे,या प्रकरणी अधिक तपास ठाणे इंचार्ज ए पी आय महादेव मांजरमकर हे करत आहेत


---माणिकराव मोरे,

पत्रकार, सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि