सोनखेड हरबळ तलावातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कार्यवाही


सोनखेड दि 11- लोहा तालुक्यातील सोनखेड हरबळ साठवण तलावातून अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर १० मार्च रोजी ग्रामपंचायत प्रशासनाकडून नुकतीच प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मागील सलग चार दिवसापासून डेरला लिफ्ट द्वारे या तलावात पाणी सोडण्यात आले आहे. सोनखेड, हरबळ, मडकी व दापशेड या चार गावांची कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना या तलावावरच अवलंबून आहे त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात या चार गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच सोनखेड ग्राम पंचायत प्रशासनाकडून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांचे 9 स्टार्टर , वायर व इतर विद्युत उपकरणे जप्त करण्यात आली आहेत, त्याशिवाय त्यांना तंबी देण्यात आली आहे की सदरील तलावातील पाणी हे पिण्यासाठी आरक्षित केलेले आहे. त्यामुळे कोणीही यानंतर विद्युत मोटारीने पाणी उपसा करू नये ,जर करण्यात आला तर प्रशासनाच्या वतीने कडक कार्यवाही करण्यात येईल व मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशा सक्त सूचना ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास अधिकारी रमाकांत नावंदे , तलाठी मारुती कदम , मंडळ अधिकारी एलके, सरपंच अच्युत मोरे , कोतवाल बालाजी आहेरकर ,अव्वल कारकून गुलाबराव मोरे, महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कोटीतीर्थ, लाईनमन भूषण गायकवाड, राजेश पांचाळ, चींचारे होमगार्ड आदींनी या कार्यवाहीसाठी सहकार्य केले.


---माणिकराव मोरे,

पत्रकार, सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि