महिलांसाठी ठरली प्रेरणादायी समुह संसाधन आय सी आर पी- सौ.रेखाताई कांबळे

जागतिक महिला दिन विशेष


*************************************************

अनेक महिलांना मिळाली रोजगाराची संधी-

54 गटांना तब्बल 1 कोटि 64 लाखांचे कर्ज मिळवून दिले,कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर,गरिबांना अन्य धान्य वाटप, रक्तदान शिबिर, सामाजिक कार्यातही अग्रेसर

*************************************************

नायगाव दि 07- नायगाव तालुक्यातील कुंटूर सारख्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात तसेच त्यांना घराचा उंबरठा ओलांडून काही तरी नवीन काम ,उद्योग करण्याची प्रेरणा मिळावी , महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पासून सुरक्षा मिळवून त्यांना स्वयं सुरक्षेचे प्रशिक्षण मिळावे अशा विविध समाजहितकारी उद्देशाने रमाबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा ,महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष व समुह संसाधन व्यक्ती म्हणून येथील रेखाताई अनिल कांबळे

कार्यरत आहेत .त्यांचा कार्याचा लाभ अनेक महिलांना मिळत आहे.

कुंटूर तालुका नायगाव येथील रहिवासी असलेली महिला रेखाताई अनिल कांबळे कुंटूरकर या सासरी आल्या तेंव्हा फक्त नववी पास होती ,तिने आपल्या जिद्दीने शिक्षण पुढे घेत दहावी अकरावी बारावी पूर्ण केले व सध्या बीएचे शिक्षण घेत आहे . तिने पहिला बचत गट स्थापन करून आज पर्यन्त कुंटुर मध्ये 60 गटाची बांधणी केली व परिसरातील दहा खेड्यांमध्ये गटाची बांधणी करून त्यांना रोजगार मिळवून देऊन त्यांना उद्योगासाठी कर्ज ही मिळवून दिले,

त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन ग्रामीण भागातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन त्यांनी मेळावे भरून केले व ग्राहकापर्यंत पोचवले, सौ कांबळे यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे . महिलांना घर व मूल सांभाळून आपल्या परिवाराचा गाडा चालवण्यासाठी चार पैसे मिळवता यावेत अशी तरतूद करून देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सौ कांबळे सध्या मोलाचे सहकार्य करत आहेत.

आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा महिलांना प्रेरणादायी ठरू शकतो.पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पुढाकाराने प्रथम रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली व पहिला गट गावांमध्ये कार्यरत झाला, आले,त्यांनी सर्वप्रथम महिलांसाठी मेळावे घेतले त्यात महिलांना शारीरिक आरोग्य . स्वच्छते चीही माहिती देण्यात आली.

महिलांना प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या घटना पासून संरक्षण करण्यासाठी माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना ग्रामीण भागातील महिलांना व स्त्रियांना आज तांत्रिक युगात अग्रेसर राहण्यासाठी डिजिटल मोबाईल सह संगणकाचेही प्राथमिक ज्ञान सौ कांबळे यांच्या प्रयत्नातून देण्यात आले, महिला आणि युवतींना मार्गदर्शन प्राथमिक शाळेमध्ये महिला सबलीकरण महिला बचत गट,महिलावरील अत्याचार , आरोग्य मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, हुंडा प्रतिबंधक मार्गदर्शन, विधवा , निराधार योजना श्रावणबाळ योजना लाभार्थी मदत, सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमात त्या सदा अग्रेसर आहेत ,त्याचबरोबर बचत गटांना गृह उद्योग व उद्योग प्रशिक्षण याबाबत सखोल मार्गदर्शन संस्थेकडून देण्यात आले . आज घडीला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील पाचशे महिला ना त्या प्रशिक्षण देत आहेत

ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय शेळी पालन, कुक्कुट पालन, हस्त कला, कीराणा दुकान , पीठाची गिरणी, झाडु बनवने, मिर्ची पावडर व हळद, साडी सेंटर, जनरल स्टोअर, शिवन काम, घोंगडी व्यवसाय, असे अनेक व्यवसाय चालवण्याचे प्रशिक्षण ग्रामीण महिलांना देऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी रेखाताई कांबळे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत

महिलांच्या निसर्गतःच संयमशील व सहनशील असतात,संघर्षमय जीवनाला तोंड देण्याची अदभूत क्षमता त्यांच्या अंगी असते, सृष्टीला नवजीवन देणारा सूर्य सुद्धा जसा परिवर्तनाच्या चक्रात सुटू शकला नाही अगदी तसेच महिलांनी पण त्या तेजस्वी सूर्यापासून प्रेरणा घेत प्रगतीचे नवनवे टप्पे पार करावेत,कुुटुंब घर याच फेऱ्यात गुंतून स्वतःला मर्यादित न ठेवता विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी ग्रामीण महिलांनीही घ्यावी या उद्देशाने सौ कांबळे सदैव प्रयत्नरत आहेत, आज महिला बचत गटाला एक भव्य उंचीवर नेऊन बचत गटातील महिलांना स्वतःचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालण्यासाठी बळकट करणार्‍या रेखाताई कांबळे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे,

ग्रामीण महिलांना स्वावलंबी होण्यासाठी त्या स्वतः कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करतात . असे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवण्यात मोलाचे कार्य केले आहेत. त्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर विविध पुरस्कार पटकावले आहेत , त्यांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन उत्कृष्ट पुरस्कारही देऊन गौरविण्यात आले. यशोदा माता महिला व बालकल्याण समितीचे पुरस्कार त्यांना देण्यात आले.

रुळलेल्या वाटेवरून चालणे कुणालाही सहज शक्य असते, मात्र स्वतःची एक वेगळी वाट तयार करून अपेक्षित लक्ष्य गाठणे हे एखाद्या कर्तबगार व्यक्तिमत्त्वाचेच लक्षण असते . विविध रोजगारातून रोजगाराच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी करावे हेच उद्दिष्ट ठरवून सौ कांबळे कार्य करीत आहेत.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर


Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि