साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापनदिना निमित्त पानसरेनगर, नायगाव येथे विविध कार्यक्रम


नायगाव दि 08- शहरातील पानसरे नगर येथील श्री साईबाबा मंदीरात श्री साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापनदिना निमित्त दिनांक 8 ते 10 जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे.

नायगाव शहरासह परिसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या पानसरे नगर साई मंदिर येथे श्री साईबाबांच्या मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्ताने दि ८ जानेवारी पासून कार्यक्रम होत आहेत. दि ८ ते १० जानेवारी दरम्यान मुख्य स्थापना व कलशारोहणाचा वर्धापन दिवसा पर्यंत सतत तीन दिवस विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत,यात काकड आरती,मंगलस्नान, श्री नैवेद्य आरती, दुपारी मध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद सायंकाळी धुपारती रात्री सव्वा आठ वाजता शेजारती असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच मुख्य दिवस १० जानेवारी रोजी दैनंदिन कार्यक्रमा सोबतच सकाळी 10 वा हरिदासी कीर्तनकार ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी महाप्रसाद वाटप होणार आहे. तेव्हा या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती श्री साईबाबा मंदिर पानसरे नगर येथील मंदिराच्या विश्वस्तच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून करण्यात आली आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि