विद्यार्थी वाहतूक दर दुप्पट होणार,पालकांनी सहकार्य करण्याचे श्री निखील लातूरकर यांचे आवाहन


नांदेड दि 28- कोविड नियमावलीचे अनुपालन करत आता विद्यार्थी वाहतूक सुरू होणार असून मागील दहा महिन्यापासून वाहतुकदारांची झालेली आर्थिक कोंडी,व सध्या असलेली 50 टक्के आसन क्षमतेची परवानगी या मुळे वाहतुकदारांना निव्वळ नाईलाजाने जादा दर आकारणी करावी लागणार असून पालक व संस्था चालकांनी वाहतुकदारांना सहानुभूती पूर्वक सहकार्य करावे असे भावनिक आवाहन वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले आहे.

दि. २७/०१/२०२१ पासून ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्ववत सुरू होत आहे,कोविड चे भान राखून या विद्यार्थ्यांची वाहतुक करतांना सामाजिक अंतराची काळजी ( Social Distancing ) घेणे अनिवार्य आहे,९ वी ते १२ वीचे वर्ग या पूर्वीच चालू झाले आहेत. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या दि. १५/०६/२०२० व १०/११/२०२० च्या परिपत्रकानूसार सर्व शाळा आता नियमितपणे सुरू होणार आहेत .

शासन नियमानूसार विद्यार्थी वाहतूकीसाठी आसन क्षमतेच्या दिडपट विद्यार्थी वाहतूक एरवी करता येते पण कोरोना महामारीच्या काळात शासन नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेसाठी आसन क्षमतेच्या ५०% विद्यार्थी वाहतुक करावी लागणार आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठीच हे नियम पाळले जाणार याची पालकांनी नोंद घेणे गरजेचे आहे, वरील नियमामुळे विद्यार्थी वाहतूकीचे दर वाहतुकदारांना निव्वळ नाइलाजास्तव दुप्पट आकारावे लागनार आहेत. मागील १० महिन्यापासून विद्यार्थी वाहतूक पूर्णपणे बंद होती,या पार्श्वभूमीवर विद्यार्थी वाहतुकदारांवर या कालावधीत अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली होती.नियमित उत्पन्न नाही आणि त्यामूळे जागेवर ठप्प असलेल्या वाहनांचीही योग्य निगा नाही,या प्रकारामुळे वाहतुकदारांना याकाळात दुप्पट आर्थिक कोंडीचा सामना करावा लागला आहे,पालकांनी वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपुर्वक विचार करून सध्याची कोविड संकटाची परिस्थिती असेपर्यंत विद्यार्थी वाहतूकीचे दर दुप्पट देउन सहकार्य करावे. असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री लातूरकर यांनी केले,तसेच कोरोना महामारीचा काळ संपताच व शासनाचा पूर्ववत परिस्थिती बाबत आदेश येताच नियमानुसार विद्यार्थी वाहतुकीचे दर पुन्हा पूर्ववत करण्यात येतील. अशी स्पष्ट ग्वाहीही लातूरकर यांनी दिली तसेच

सध्याच्या संकटमय परिस्थिती चा विचार करीन सर्व फायनान्स कंपन्यांनीही वाहने रस्त्यावर दिसताच कुठल्याही स्कूलबस, व्हॅन, मॅजिक च्या चालक मालक यांची अडवणूक करू नये अशी विनंती श्री लातूरकर यांनी केली आहे,डबघाईला आलेल्या वाहतुकदारांना सतावण्याचा प्रयत्न करणाऱ्या फायनान्स कंपन्यांना एकजुटीने मोठया आंदोलना द्वारे धडा शिकवण्यात येईल असा इशाराही लातूरकर यांनी दिला आहे---श्रीकांत देव,

मुख्य संपादक,नांदेड वैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि