नापिकी व कर्जापोटी आत्महत्या केलेल्या सहा शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटप

नायगाव दि 03 - सन २०१९ मध्ये आत्महत्या केलेल्या नायगाव तालुक्यातील ६ शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दहा हजार रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत नुकताच प्रदान करण्यात आला.

नांदेड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते- खालील समितीने पात्र ठरवलेल्या तसेच जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळातील नापिकीमुळे नायगाव तालुक्यातील

सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती, त्यांच्या वारसांना जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे नायगाव पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गायकवाड यांनी वाटप केले.

नायगाव तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांत कार्ला येथील उद्धव शंकरराव वडगावे, गोविंद काशीराम राठोड, हिप्परगा जानेराव येथील सूर्यकांत बालाजी कदम, धुप्पा येथील प्रल्हाद लक्ष्मण जांभळे, बरबडा येथील श्रीमती निलावतीबाई तमा येथील प्रकाश टोलाबा कापसे, नरसी व्यंकटराव सर्जे यांचा समावेश आहे.

बुधवारी नरसी येथे पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गायकवाड, माजी सरपंच प्रतिनिधी गजानन भिलवंडे , ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद गोरे, ग्रा. पं. सदस्य राजेश वडगावे यांच्या उपस्थितीत नरसी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसांना शासनाच्या १० हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि