विद्यार्थिनी सोबत अश्लील व्हॉट्सअप चॅटिंग व छेडछाड करणारा शिक्षक चतुर्भुज

मागासवर्गीय मुलीवरील अत्त्याचाराच्या घटनेत आणखी एक भर


नायगाव दि 02- विद्यार्थिनी सोबत अश्लिल व्हॉट्सअप चॅटिंग , वर्गात सलगीचा प्रयत्न व बस मध्येही मुलीसोबत छेडछाड केल्याच्या प्रकरणावरून नायगाव तालुक्यातील एका शिक्षकाला कुंटुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे या घटनेमुळे नायगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून ऑनलाइन शिक्षणात अश्लीलतेचा उपद्व्याप करण्याचा भेकड प्रकार उघडकीस आल्यामुळे पालक वर्गात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

नायगाव तालुक्यातील देगाव येथील पूज्य साने गुरुजी च्या नावाने चालणाऱ्या विद्यालयातील शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनी सोबत व्हॉट्सअप वर परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवले व अश्लील विषयाची मागणी व व्हॉट्सअप चॅटिंग पोस्ट केल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केल्याचा प्रकार मंगळवार दिनांक 2 मार्च रोजी घडला. तर त्याच शाळेत शिकून इतरत्र शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या एका मुली सोबतही याच शिक्षकाने बस मध्ये अश्लील छेडछाड केल्याबद्दलही याच तक्रारीत नोंद केल्याने सदर शिक्षका विरुद्ध लगेचच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, नायगाव तालुक्यातील देगाव येथील शाळेत आसपासच्या खेड्यातील विदयार्थी शिक्षणासाठी पायी व बसने येतात.कोरोना महामारी मुळे शिक्षणाचा प्रकार ऑनलाइन झाला व विद्यार्थी व शिक्षक यांचे नातेही ऑनलाइन झाले. विद्यार्थी पालकांचे किंवा स्वतःचे मोबाईल हँडसेट शिक्षकाना विश्वासाने देऊ लागले पण या विश्वासाचा असा गैरफायदा घेण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.

येथील शिक्षक बापूराव श्रीपतराव मोरे रा देगाव वय 48 यांनी आपल्याच शाळेतील इयता नववी मध्ये शिकणाऱ्या मुलीस व्हॉट्सअप वर मार्क जास्त टाकतो म्हणून काही विचित्र मागणी केली व ऑफलाईन शाळेत जवळीकता साधली असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे, त्या मुलीच्या बहिणीलाही बस मध्ये छेडले होते असाही आरोप या शिक्षकावर करण्यात आला आहे.या प्रकरणात कुंटुर पोलिसात 354 ड 12 , 65,अनुसुचित जाती कलम 3 (1),(w),(1)..3(1) (w) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे कुंटुर सपोनि पठाण यांनी सांगितले.पुढील तपास पोलोस उपअधीक्षक बिलोली हे करीत आहेत.


शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी हिडीस घटना - राहुल गायकवाड

देगावच्या पूज्य साने गुरुजी विद्यालयातील शिक्षकांकडून झालेल्या या प्रकाराबद्दल समाजसेवक राहुल गायकवाड,कपिल डुंमने व इतर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी अत्यन्त निंदनीय घटना असून आरोपीस कडक व त्वरित शिक्षा केली जाण्याची मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी केली.

या विषयी आपण प्रजासत्ताक पार्टी चे सुरेश दादा गायकवाड यांना बोललो त्यांनी पोलीस अधीक्षकांना माहिती कळवली व रामदास आठवले यांच्या ही कानावर टाकले असून सदर शिक्षकाला बडतर्फ करावे व त्यास कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे, संस्था चालक माजी आ.गगाधर पटणे यांनीही तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले असल्याचे राहुल गायकवाड यांनी सांगितले.सदर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पीडित कुटुंबिया समवेत कपिल डुंमने,प्रवीण भालेराव,अविनाश गायकवाड व इतर संघटना यांनी पुढाकार घेतला होता.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि