अश्लील व्हाट्स अप चाट प्रकरणी देगावच्या साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक मोरे निलंबित

नायगाव दि 07- देगाव येथील साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक मोरे यांनी आपल्याच शाळेतील आजी-माजी विद्यार्थीनीला व्हाट्स अॅप वर अश्लील मेसेज करून वेळोवेळी लगट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कुंटुर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता,सदरील शिक्षक बापुराव श्रीपत मोरे यांना आता संस्थेनेही निलंबित केले आहे. तसा अहवाल नांदेड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आला असून सदरील शिक्षक महाशय सध्या जेलमध्ये आहेत.

आपल्या संस्थेतील शिक्षकाने असे गुण उधळल्याचे उघडकीस येताच संस्थेचे अध्यक्ष माजी आ.गंगाधर पटने यांनी या शाळेला भेट देवून सदर शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली, चुकीचे काम करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. मोरे यांच्यावर नियमाप्रमाणे त्वरित कारवाई करण्याचे आदेश पटने यांनी दिले.या निमित्ताने पटने यांच्या परखड व पारदर्शक कार्यपद्धतीची चुणूक दिसून आली आहे

नायगाव तालुक्यात नामांकीत असलेल्या देगाव येथील पुज्य साने गुरूजी हायस्कूल शाळेतील बापुराव मोरे या शिक्षकाने शाळेतील इयता ९ व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीबद्दल डोक्यात सडका विचार ठेवून आपल्या शिक्षकी पेशाला अशोभनीय वृत्तीचे प्रदर्शन घडवले,

मुलीना रात्री अपरात्री वाट्सअॅपवर निरनिराळे आक्षेपार्ह मेसेज पाठवणे व विनाकारण फोन करण्याची कामगिरी या शिक्षकाने केली असल्याची तक्रार आहे. शिक्षकांचा मनोभावे आदर करणाऱ्या निरागस मुलीना सुरुवातीला आपल्या शिक्षकांच्या वाईट उद्देशाबद्दल कुठलीच जाणीव झाली नाही. परंतु एक -दोन वेळा भेट झाली असता मी परीक्षेत तुला मदत करतो. तु माझ्या संपर्कात रहा असे म्हणत या शिक्षकाने वाईट उद्देशाने त्यांना स्पर्श केला त्यावेळी या विद्यार्थीनीना गुरुजींच्या मनातील वाईट विचाराचा हेतु लक्षात आला, ती मुलगी सावध झाली व घाबरून गेली.गुरूच्या अशा वागण्याबद्दल काय बोलावे आणि कोणाला कसे सांगावे याबद्दल तिला काहीच सुचेनासे झाले होते. आपल्याला आलेला वाईट अनुभव तिने आपल्या मैत्रिणीला सांगीतला, अखेर हा विषय नायगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचला , त्यांनी तात्काळ या शिक्षकाच्या वर्तनाबाबत सखोल माहिती व पुरावे जमवून सरळ देगाव येथील शाळा गाठली व या शिक्षकाला जाब विचारत झोडपून काढले. त्यानंतर त्या शिक्षकाला कुंटुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले, दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार या शिक्षकाच्याविरोधात अट्रोसिटी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.

हा प्रकार शिक्षक व विद्यार्थी या पवित्र नात्यात काळिमा फासणारा ठरला असून संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी त्या शिक्षकाला पाठीशी न घालता तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला व निलंबनाची शिफारस केली,या निर्णयामुळे मागासवर्गीय संघटनातून संस्थेच्या धोरणाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि