दोन मोटार सायकलीच्या समोरासमोरील धडकेत मांजरमचे शिक्षक शेषेराव पवार यांचा जागीच मृत्यू

रस्त्यावर दिशा दर्शक व वळणरस्ता संकेत फलक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले.

*************************************************

नायगाव दि 29 - गडगा कहाळा रस्त्यावर मांजरम शिवाररा लगतच्या वळण रस्त्यावर दोन मोटार सायकलीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक शिक्षक जागीच ठार झाले तर दुस-या मोटार सायकलवरील एक पुरुष व महिला दोन्ही गंभीर जखमी आहेत,दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला वर्ग करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला सदरील रस्ता केटी कंट्रेक्शन यांनी नव्याने तयार केलेआहे, या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.याच रस्त्यावर दिशा दर्शक फलक व वळणरस्ता संकेत फलक लावले नसल्याने अपघाताचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे.

दि २९ एप्रिल रोजी गुरूवारी सकाळी दहाच्या दरम्यान मांजरम येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक शेषेराव भुजंगराव पवार (वय ५४) हे मोटार सायकलवर शाळेच्या कामा निमित्त नांदेड येथून मांजरमला येत होते. तर मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथील नात्याने सासू जावई असलेले एक महिला व एक पुरुष असे दोघेजण कामा निमित्त नांदेडला जात होते,या दोन्ही मोटारसायकलिंची भरधाव वेगात समोरासमोर जबर धडक झाली.यात शेषराव पवार यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातातील दुसऱ्या वाहनवरील दोन्ही गंभीर जखमींना तत्काळ रूग्ण वाहिका घटनास्थळी बोलून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आल्याची माहिती मांजरमचे पोलिस पाटील जयराज शिंदे यांनी दिली. सदरील शिक्षक विद्यार्थी प्रिय होते,शिक्षकी पेशासह , साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे शेषराव पवार गुरूजी यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि