टेंभुर्णी खून खटला प्रकरणातील आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी -१५ वर्षानंतर टेंभुर्णीत घडला खून

नायगाव,दि 14- टेंभुर्णी ता नायगाव खून प्रकरणातील आरोपीस अटक करून

पोलिसांनी नायगाव येथील कनिष्ठ स्तर न्यायाधीश वहाब साहेब यांच्या समोर बुधवारी हजर केले असता न्यायाधीश महोदयांनी आरोपीस 17 एप्रिल पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.सदर माहिती तपासणी अधिकारी उपविभागीय पोलीस अधीक्षक बिलोली सिद्धेश्वर धुमाळ यांनी दिली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की टेंभुर्णी ता नायगाव या गावात पंधरा वर्षांपूर्वी पर्यन्त अनेक खुनाच्या मालिका घडल्या आहेत, सन 2005 मध्ये एका माजी सरपंचांचा खून झाल्या नंतर मात्र या गावात अशी घटना घडली नव्हती. परंतु तब्बल 15 ते 16 वर्षांनी झालेल्या या खूनामुळे हे गाव।ग्रीन झोन मधून पुन्हा रेड झोन मध्ये गेले आहे. ग्रीन झोन मध्ये आलेल्या या टेंभुर्णी गावाला पुन्हा चर्चेत आणणारी ही कलंकीत घटना येथील गावकऱ्यासाठीही मोठा धक्का देणारी ठरली आहे.टेभुर्णीकर आधीच कोरोनाच्या संकटातून सावरत असतांना त्यांच्या पाडव्याचा गोडवा या खून प्रकरणाने कडवट झाला आहे.कौटुंबिक वादातून मोठ्या भावानेच छोट्या भावाचा घात केल्यामुळे संपूर्ण टेंभुर्णी गाव या घटनेने हळहळले आहे.

या घटनेचा तपास करणारे बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिक्षक सिध्देश्वर धुमाळ यांनीही टेंभुर्णी येथे भेट देवून संपूर्ण माहिती घेतली.आरोपी संदीप वडजे याने आपला लहान भाऊ विश्वजित सोबतच्या कौटुंबिक वाद व झालेली पूर्वीची भांडणे पहाता निव्वळ मनातील राग धरून केलेल्या या खूना मागे मुख्य आरोपीसोबत प्रोत्साहन देण्यासाठी इतर कोणी सामील आहे का या अनुषंगाने ही पोलीस यंत्रणा चाचपणी करत आहे असे धुमाळ साहेब यांनी यावेळी सांगितले,त्याच दृष्टीने पोलीस तपासासाठी चार दिवसाची पोलीस कोठडी मा.न्यायालयाने दिली असून या घटनेचा पूर्ण छडा लावणारच असेही धुमाळ यांनी सांगितले

. टेंभुर्णी येथील नवी आबादीमध्ये कॅनालच्या बाजूला विश्वजित वडजे ज्या नवीन घराचे बांधकाम करत होता तेथेच बांधकामावर घरासमोरच झोपला होता, पाडव्याच्या पहाटे गाढ झोपेत असलेल्या विश्वजितच्या डोळ्यात मोठ्या भावाने तिखट टाकले त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वारही केला. या हल्ल्यात विश्वजीत जागीच गतप्राण झाला. गावाला लागूनच ही घटना घडली पण घटना घडली तेंव्हा काहीच आरडा ओरड कशी झाली नाही ? खुनी एक की अनेक अशा विविध पार्श्वभूमीवर अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बिलोली सिध्देश्वर धुमाळ यांनी चालवला आहे.

या घटने मुळे पूर्वी खुनाच्या मालिकेने गाजलेले टेंभुर्णी हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, नुकतीच येथील ग्राम पंचायत बिनविरोध काढून सूगंधराव उर्फ मुन्ना वडजे या युवकाने एक आदर्श निर्माण केला असतांना या घटनेने गावाला गालबोट लागल्याची चर्चा सुरू आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि