बेटकबेळी येथे धाडसी चोरी,१ लाख ८० हजार रोख व अडीच तोळे सोने घेऊन चोरट्याने केला पोबारा

नायगाव दि 14- बंद घराच्या दाराची कोंडी तोडून चोरट्यांनी सालगड्याला देण्यासाठी घरात ठेवलेले एक लाख ८० हजार रोख व आडीच तोळे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केल्याची घटना दिनांक १२ एप्रिल सोमवारी रात्री नायगाव तालुक्यातीलबेटकबिलोली येथे घडली आहे. या घटनेने या शेतकऱ्याला जबर फटका बसला आधीच सालगडी मिळण्याची अडचण त्यात या चोरीची भर पडली आहे.

ग्रामीण भागातील शेतकर्यांत दरवर्षी गुडीपाडव्याला शेतात सालगडी ठेवण्याची प्रथा असून सालगड्याचा पगार ठरवल्यावर नवीन गड्याला सालाची पूर्ण रक्कम त्याच दिवशी द्यावी लागते. त्यासाठी बेटकबिलोली येथील शेतकरी आत्माराम विठ्ठल पवार यांनी सालगड्याला पगार देण्यासाठी शेतमाल विकून एक लाख ऐंशी हजार रुपये घरात आणून ठेवले होते.

दिनांक 13 रोजी मंगळवारी गुढी पाडवा सालगड्याचा पगार ते देणार होते. पण गुडीपाडव्याच्या पुर्वसंध्येला चोरट्यांनी रक्कम लंपास केली असल्याने पवार यांच्यासमोर फार मोठे संकट उभे राहिले आहे.

शेतकरी आत्माराम पवार हे नेहमीप्रमाणे सहकुटुंब घरात झोपले असता बाजूच्या खोलीची कडी तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले एक लाख ८० हजाराची रक्कम आडीच तोळ्याचे सोन्याचे दागिनेही लंपास केले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ऐन गुडीपाडव्याच्या दिवशीच चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या घरात चोरी करुन सालगड्याला द्यावयाची रक्कमच लंपास केली असल्याने आता सालगड्याला काय द्यावे असा प्रश्न या शेतकर्या समोर निर्माण झाला आहे.

या चोरीच्या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी हे श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले. पण काहीही उपयोग झाला नाही. या भागात मागील अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरुच असून झालेल्या चोऱ्याचा पोलिसांना तपास लागतच नाही अशी परिस्थिती आहे,त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि