टाळूवरच्या लोण्यास सोकावलेल्यांची लॉक डाउन पूर्वतयारी जोरात; तंबाखू जन्य पदार्थांची कृत्रिम टंचाई

भोकर दि 23- करोना भयामुळे प्रशासनाने दि 24 च्या मध्यरात्री पासून जिल्ह्यात लागू केलेले लॉक डाउन सर्वसामान्य लोकांसाठी, रोज कमाईवर जगणाऱ्यांसाठी,व्यापाऱ्यांसाठी संकट ठरत असले तरी टाळूवरचे लोणी खाण्यात सराईत असलेल्यांनी या लॉक डाउन मध्येही दिवाळी साजरी करण्यासाठी जोरदार पूर्वतयारी चालवली असल्याचे दिसून येत आहे

मागील मार्च मध्ये पार पडलेल्या लॉक डाउन मध्ये बहुतेक समाज घटकांचे आर्थिक नुकसान झाले असले तरी अवैध व्यावसायिकांनी मात्र आपले उखळ चांगलेच पांढरे करून घेतल्याचे दिसून आले,गोर गरिबांसाठी,कष्टकऱ्यांसाठी विरंगुळा असलेला तंबाखू चा तोटाही त्या काळात दहा ते बारा पटीच्या चढ्या दराने विकल्या गेला होता,मागील वर्षातील लॉक डाउन मध्ये व लॉक डाउन संपल्यानंतरच्या कालावधीत शॉर्टेज च्या नावाखाली काही अवैध तंबाखू,मद्य विक्रेत्यांनी आपली चांदी करून घेतली होती,आता उद्यापासून सुरू होणाऱ्या लॉक डाउन मध्येही काहीजणांना संधी दिसत असल्याचे स्पष्ट होत आहे,

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी जाहीर करताच तंबाखू विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करुन ग्राहकांना वेठीस धरण्याचा गैरप्रकार भोकर शहरात घडल्याचे दिसून आले.

नांदेड जिल्ह्यात करोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी कडक पाऊल उचलत दि.२४ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान संचारबंदिचा निर्णय घेतला. याबाबत चा आदेश दि.२१ मार्च रोजी सायंकाळी प्रसिद्ध होताच संधीसाधू प्रवृत्तीच्या काही बनेल व्यापाऱ्यांनी चालून आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी लगेचच पावले उचलल्याचे दिसून आले, गायछाप,सुर्य जर्दा विक्री करणाऱ्या ठोक व्यापाऱ्यांनी विक्री थांबवत शहरात कृत्रिम टंचाई निर्माण केली. किरकोळ विक्रेत्यांनी लाँकडाऊन मध्ये मागणी वाढण्याची शक्यता ग्राह्य धरून स्टाँक खरेदी करीता गर्दी केली होती, ठोक व्यापाऱ्यांनी मात्र जर्दा उपलब्ध नसल्याची सबब पुढे करून लगेचच गायछाप,सुर्य व जर्द्याचे भाव रातोरात वधारून घेतल्याचे दिसून आले. भोकर शहरात दररोज लाखो रुपयांचा जर्दा व बंदी असलेल्या गुटख्याची विक्री सर्रासपणे होते. ठोक विक्रेत्यांची मोठमोथी गोदामे,अवैध जर्दा साठे शहरात अस्तित्वात आहेत,मागणी प्रमाणे पुढील महिनाभर पुरवठा करता येईल एव्हढा स्टॉक ही उपलब्ध असल्याची माहिती आहे,असे असूनही जास्तीचा नफा कमवण्यासाठी नागरिकांना वेठीस धरून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रकार लगेचच सुरू झाला आहे,गोरगरिबांसाठी विरंगुळा ठरणाऱ्या जर्द्याची कृत्रिम टंचाई निर्माण करणा-या विरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई करावी,शहरातील अवैध गुटखा साठ्यावर धाडी घालाव्यात व टाळू वरचे लोणी खाण्यास सोकावलेल्यांना धडा शिकवला अशी मागणी किरकोळ विक्रेते व जर्दा शौकीना कडून व्यक्त होत आहे.


---श्रीकांत देव

मुख्य संपादक,नांदेड वैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि