पुलवामा हल्ल्यातील जवानांना शेळगाव छत्री येथे आदरांजली


नायगाव दि 17- पुलवामा हल्ल्याच्या दुःखद घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्या बद्दल पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठाण शेळगांव(छ.)ता नायगाव च्या वतीने हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना कँडल मार्च व अभिवादन सभेद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,

शेळगाव छत्री या गावातून लक्षणीय कँडल रॅली काढण्यात आली या वेळी तरुण मंडळी व गावातील देशभक्त मोठ्या संख्येने हजर होते ,याच कार्यक्रमात सैनिकांच्या आई-वडिलांचा सत्कार तसेच कोरोना योद्ध्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन मारोती सालेगाये सर,संजय चोंडे,नागनाथ शहापुरे,सचिन चोंडे,अनेराये सर,पेदे सर,शहापुरे सर, आदींनी परिश्रमपूर्वक अतिशय सुंदर पद्धतीने केले. या वेळी देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी सर्व परिसर दुमदुमला होता.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि