शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

**************************************************

नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्वी उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या व्ही.पी.के. उद्योग समूहाच्या वतीने नायगाव मतदारसंघातील नायगाव उमरी धर्माबाद अशा तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्याचा मदातपूर्ण उपक्रम जाहीर केला आहे, सदरील मदत घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी कवळे गुरुजी किंवा माजी आ. चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात नावनोंदणी करण्याचे आवाहन कवळे गुरुजी यांनी केले आहे.

मारोतराव कवळे गुरुजी यांचा उद्योग समूह व व्यंकटराव पाटील बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने या भागात नेहमीच विविध सामाजिक व लोकोपयोगी नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविले जात असतात, गोरगरीब जनता व शेतकरी यांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मार्ग दाखवण्यासाठी तसेच आवश्यक मदत करण्यासाठी कवळे समूह नेहमीच अग्रेसर असतो, यापैकीच एक सहाय्यभूत उपक्रम म्हणून यावर्षी व्ही.पी.के. समूहाच्या वतीने शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील तलावातून मोफत गाळ काढून देण्याची योजना संस्थेने हाती घेतली आहे, या उपक्रमाचा नायगाव उमरी धर्माबाद या तिन्ही तालुक्यातील शेतकरी वर्गाने जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, आपल्या शेतात सुपीक गाळाचे संचयन करून आपल्या शेतीची पोत सुधारणी करून घ्यावी असे आवाहन व्ही. पी.के. समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नायगाव शहरातील माजी आमदार वसंत चव्हाण यांचे संपर्क कार्यालयात एका प्रासंगिक बैठकीत कवळे गुरुजी यांनी सदर आवाहन केले आहे

**************************************************

शेतक-र्यानी या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा - कवळे गुरुजी

तिन्ही तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेमधून त्यांच्या परिसरातील तळ्यातील गाळ मोफत उपसा करून आपल्या शेतात नेण्यासाठी व्ही.पी.के. समुहा मार्फत

उपलब्ध केल्या जाणार आहे, शेत जमिनीचा कस सुधारण्यासाठी अत्यन्त उपयोगी ठरेल असा गाळ स्वतःच्या वाहनाद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना नेता येईल, याबाबत इच्छुक शेतकऱ्यांनी कवळे गुरुजी पतसंस्थेत व संपर्क कार्यालयात नाव नोंदणी करावी. त्यानुसार गाळ काढण्याचे व उपलब्ध करून देण्याचे नियोजन आखता येईल.या साठी शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करणे गरजेचे आहे असे आवाहन कवळे गुरुजी यांनी यावेळी केले

*************************************************


निर्णय उशिरा झाला असला तरी प्रत्यक्ष काम त्वरेने सुरू केल्यास शेतकऱ्यांचा फायदाच

*************************************************

नायगाव तालुक्याचा पाणीसाठ्यावर अवलंबून असलेल्या तसेच शेजारच्या कंधार लोहा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भूकमारी तलावातील गाळमाती जेसीबी उद्योजकांनी फायद्याच्या हेतूने चढ्या भावाने विकणे चालवले आहे,व्ही.पी.के. समुहाने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारा सदरील निर्णय थोडा उशिरा घेतल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावा तेवढा फायदा होईल का असा प्रश्न उपस्थित करून या भागातील शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे यांनी येत्या 20 दिवसातच पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अत्यंत त्वरेने ही योजना अंमलात आणून सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल यादृष्टीने पाऊल उचलावे अशी मागणीही सोशल मीडिया च्या माध्यमातून केली आहे.--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज