स्त्रियांनी अबला नव्हे तर खंबीर सबला होऊन स्वावलंबी होणे ही काळाची गरज - शिवराज पाटील होटाळकर


नायगाव दि 08- स्त्रियांनी आजच्या विज्ञान युगात अबला नाही तर सबला होणे तसेच मेहनतीने स्वकष्टार्जित जीवन जगून स्वावलंबी होणे ही आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी केले.

नायगाव येथील यमुनाबाई मुलीचे विद्यालय या शाळेत नायगाव पोलीस स्टेशन च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून "सन्मान महिलांचा" हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना शिवराज पाटील पुढे म्हणाले की अनेक ठिकाणी स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाल्याच्या घटना एकूण मन खिन्न होते,अशा अप्रिय घटना घडूच नयेत यासाठी स्त्रीयांनी स्वावलंबी बनावे,खंबीर व्हावे व स्वहित जोपासूनच जीवन जगावे.

स्त्री जन्मा तूझी ही करूण कहाणी- ओठावर हसू आणी डोळ्यामधे पाणी या उक्तीप्रमाणे आजच्या काळातही काही महीलांची अशीच करूण कहाणी समाजाला दिसून येते, पूर्वीच्या काळातील स्त्रियांची परावलंबी स्थिती आज पूर्णपणे बदललेली असली तरी "भय इथले अजून संपत नाही" असे प्रसंग अधून मधून नाईलाजाने,अनुभवावे,ऐकावे,पाहावे लागतात, वास्तविक पाहता सामाजिक राजकीय क्षेञासह सर्वच क्षेत्रात आजच्या महिला सरसपणे आपले योगदान नोंदवत आहेत, पंरतु अजूनही ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न मात्र खूपच जटील आहेत, अजूनही ग्रामीण महिलांची स्थिती अबला म्हणूनच संबोधण्याजोगी आहे, असे नकारात्मक अनुभव अजूनही वास्तवात असले तरी सर्वच स्ञीयानी आता अबला न राहता सबला झालेच पाहिजे,ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन होटाळकर यांनी केले,यावेळी विद्यालयाच्या अनेक विद्यार्थीनीनीही आपल्या भाषणातून महिला सक्षमीकरण या विषयावर उत्स्फूर्तपणे आपले विचार व्यक्त केले.

नायगाव पोलीस ठाण्याचे पो.नि. आर एस पडवळ पो. हे.कॉ वळगे यांनी महिला शिक्षिका व विद्यार्थिनी यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.या कार्यक्रमास प्राचार्य के.व्ही.फाजगे, पर्यवेक्षक संजय नकाते, पो.नि.आर एस पडवळ,हटवालमॅडम यांनीही मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास महेश शिंदे,प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनंदा बाळासाहेब पांडे , सौ फाजगे मॅडम,हटवाल मॅडम,जांभळे मॅडम,देशपांडे मॅडम,तगडपलेवार मॅडम,शिंदे मॅडम,हंबर्डे मॅडम,पवार मॅडम,महाद्वाड मॅडम,तसेच यमुनाबाई विद्यालयाचे सर्व महिला व पुरुष कर्मचारी , विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचलन बापुलें यांनी तर आभार नकाते सर यांनी मानले


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि