नायगाव येथे जि.प.बांधकाम उपविभागीय कार्यालया साठी जागेची पाहणी,ना.चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन होणार

ग्रामसचिवालयाच्या इमारतीत उपविभागीय कार्यालय सुरू करणार - सभापती संजय अप्पा बेळगे

*************************************************

नायगाव दि 10 - नायगाव येथे जि.प.बांधकाम उपविभागीय कार्यालयास सभापती संजय अप्पा बेळगे यांच्या पाठपुराव्याने मान्यता मिळाल्याची विकासवार्ता आली असून लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते तर माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या कार्यालयाचे उदघाटन होणार असल्याची माहिती संजय आपा बेळगे यांनी दिली.या नियोजित व महत्वाच्या कार्यालयासाठी नायगाव च्या ग्रामसचिवालयाची इमारत सध्या निवडण्यात आली असल्याचेही त्यांनी कळविले.

नायगाव येथे जि.प.बांधकाम विभागाचे कार्यालय होते पण उपविभागीय कार्यालय मात्र बिलोली येथे सध्या कार्यान्वित असल्याने प्रत्येक संबंधित कामासाठी आधी बिलोली येथे जाऊन नंतर नांदेड येथे जावे लागत आहे, अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही अडचण व कामाचा खोळंबा लक्षात घेऊन जि प बांधकाम सभापती संजय अप्पा बेळगे यांनी आपल्या तालुक्यातच कार्यालय व्हावे या साठी पालकमंत्री ना.चव्हाण व माजी आ.चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली या सार्वजनिक मागणीचा पाठपुरावा चालवला होता,त्यांच्या प्रयत्नास आता यश मिळाले आहे.

या सुरू होऊ घातलेल्या नव्या उपविभागीय बांधकाम कार्यालया साठी सोमवारी माजी आ.वसंत चव्हाण,जि.प.अधीक्षक अभियंता गहिरवार साहेब व सभापती संजय अप्पा बेळगे,उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण ,प्रभारी मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर चेअरमन प्रदीप पाटील कल्याण यांनी शहरात चार पाच ठिकाणी पहाणी केली व सर्वानुमते येथील ग्रामसचिवालायाच्या इमारतीची निवड केली आहे, या जागेत येत्या काही दिवसातच नव्या कार्यालयाचे रीतसर उदघाटन केले जाणार असल्याची माहिती संजय अप्पा बेळगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि